Description
चंदेरी दुनियेतले हे चमचमणारे तारे ... कोणी एका रात्रीत 'स्टार 'होतो तर कोणाला वर्षानुवर्षं झगडूनही यश हुलकावणी देत राहतं . रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनयाचा ' शहेनशाह ' इथे जन्माला येतोतर ' किंग खान ' बनून कोणी तरुण-तरुणींना भुरळ घालतो . कोणाची कारकिर्द दशकानुदशकांची असते तर कोणाची काही आठवड्यांची ... चेहरे आणि मुखवटे यांचं इतकं बेमालूम नातं असतं की खरं काय आणि खोटं काय हे कोणीच सांगू शकत नाही . या मायावी दुनियेतल्या म्हणजे बॉलीवूडमधल्या तारे-तारकांचं वलयांकित आयुष्य आभासी भासत असलं तरी तितकंच वास्तववादी आणि हवंस वाटणारं ... त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घेण्यात सर्वांनाच रस असतो . ' एंटरटेनमेंट ' च्या नावाखाली त्यांच्या ' गॉसिप ' च्या चर्चा सर्वत्र रंगतात ... उमेदीच्या काळात रुपेरी पडदा गाजवणारे दिग्गज कलाकार ... आणि स्वतः ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी धडपडणारी तरुणाई अशा जुन्या - नव्या कलाकारांशी मुलाखतकार पूजा सामंत यांनी साधलेला संवाद !
Details
Publisher - Sakal Media Pvt. Ltd.
Language - Marathi
Perfect Bound
Contributors
By author
Pooja Samant
Published Date - 2022-02-22
ISBN - 9789389834772
Dimensions - 21.6 x 14 x 0.6 cm
Page Count - 104
Payment & Security
Your payment information is processed securely. We do not store credit card details nor have access to your credit card information.